बीड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबाजोगाई यांच्या वतीने तालुका व शहर स्तरावरील आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे उत्साहात पार पडली.
बैठकीत संघटन बळकटीकरण, कार्यकर्त्यांची एकजूट आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीचे पुढील धोरण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, अंबाजोगाई शहरातील काही नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून पक्षसंघटनेला नवी उर्जा देण्यात आली.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी निवडणुकीत पक्षाचे विचार जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis