छत्रपती संभाजीनगर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।जालना येथील बुद्ध विहार परिसरातील बेड कॉंक्रिटीकरण बांधकामाचे भूमिपूजन आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते संपन्न झाले
सार्वजनिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत राहुल नगर येथील बुद्ध विहार परिसरात बेड कॉंक्रिटीकरण बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन सोहळा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ व सुलभ पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असून, रस्त्याच्या सुधारित बांधकामामुळे वाहतुकीसाठीही मोठी सोय होणार आहे.
यावेळी सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख विष्णु पाचफुले, विजय जाधव, संजय देटे, संजय डुकरे, शरद ढाकणे, ॲड. बबन मगरे, संदीप साबळे, स्वप्निल हिवराळे, सुरज बोर्डे, तसेच परिसरातील महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी आमदार अर्जुनराव खोतकर म्हणाले की, “जनतेच्या मूलभूत गरजांची पूर्तता हा आमचा नेहमीच प्रमुख उद्देश राहिला आहे. राहुलनगर परिसरात होत असलेले हे कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना पावसाळ्यातील चिखल, धूळ आणि वाहतुकीच्या अडचणींपासून मोठा दिलासा मिळेल.”
आमदार अर्जुनराव खोतकर यांनी पुढे सांगितले की, “जालना शहराच्या सर्व भागात विकासकामे गतीने सुरू आहेत. सार्वजनिक विकास कार्यक्रम निधीच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न सुरूच राहतील.”
---------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis