चंद्रपूर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत 'मैफिड्रोन ड्रग' या अंमली पदार्थाची विक्री प्रकरणी ५२८ ग्रॅम एम. डी. ड्रग्स जप्त केले आहे . या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.
रविवारी दुपारी मुंबई येथील वसीम इमदाद खान हा कारने चंद्रपूरात एम.डी ड्रग्ज पावडर विक्री करीता घेवुन येणार होता, याची गोपनीय माहिती मिळाल्यावर नागपूर - चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमाक ३६३ वरील साखरवाही फाट्याजवळील एच. पी पेट्रोल पंप समोर येथे सापळा रचुन वसीम इमदाद खान (३७) यास कारसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून २६ लाख ४० हजार रुपये किमतीचे ५२८ ग्रॅम एम. डी. ड्रग्स जप्त करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव