अमरावती, 6 ऑक्टोबर (हिं.स.)
महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करत असलेल्या बोलेरो पिकअप वाहनावर बडनेरा पोलिसांनी कारवाई करून 10,07,206/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत अफसर खान मिया खान (50, रा. कमेला ग्राउंड, नागपुरी गेट, अमरावती) या इसमास ताब्यात घेण्यात आले आहे.खात्रीलायक माहितीच्या आधारे बडनेरा हद्दीत पोलिसांनी छापा टाकला असता अफसर खान हा बोलेरो पिकअपमधून गुटख्याची वाहतूक करताना आढळून आला. झडतीदरम्यान पिकअपमध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधित तंबाखू मिश्रित सुपारी (गुटखा) आढळून आला.पोलिसांनी चौकशी केली असता, हा माल अमीन शेख (रा. बडनेरा) याचा असल्याची माहिती अफसर खानने दिली. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दोघांविरुद्ध बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आणि पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी