फुलनार नक्षल चकमकीप्रकरणी दंडाधिकारीय चौकशी
नागरिकांना निवेदन सादर करण्याचे आवाहन गडचिरोली., 6 ऑक्टोबर (हिं.स.) पोलीस स्टेशन कोठी, पोलीस उपविभाग भामरागड अंतर्गत मौजा फुलनार जंगल परिसरात दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या पोलीस व नक्षल चकमकीदरम्यान चार नक्षलवादी (एक पुरुष व तीन महिला) ठार झ
फुलनार नक्षल चकमकीप्रकरणी दंडाधिकारीय चौकशी


नागरिकांना निवेदन सादर करण्याचे आवाहन

गडचिरोली., 6 ऑक्टोबर (हिं.स.)

पोलीस स्टेशन कोठी, पोलीस उपविभाग भामरागड अंतर्गत मौजा फुलनार जंगल परिसरात दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या पोलीस व नक्षल चकमकीदरम्यान चार नक्षलवादी (एक पुरुष व तीन महिला) ठार झाले होते. घटनास्थळी शस्त्रसज्ज अवस्थेत हे मृतदेह आढळून आल्याने सदर घटनेचे कारण आणि पार्श्वभूमी शोधण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९६ अन्वये दंडाधिकारीय चौकशी करण्यात येत आहे.

ही चौकशी उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली श्री. अमर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येत आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या, घटनेदरम्यान उपस्थित असणाऱ्या किंवा या संदर्भात काही अनुभव अथवा पुरावे असणाऱ्या नागरिकांनी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह १५ दिवसांच्या आत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांच्या कार्यालयात जमा करावे.

नागरिकांनी आपल्या निवेदनात घटनेचे स्वतःच्या पाहिल्याप्रमाणे वर्णन, घटनेपूर्व किंवा घटनेनंतर घडलेल्या संबंधित घटना, त्या संदर्भातील अनुभव, शासकीय यंत्रणेचा सहभाग किंवा प्रतिक्रिया याविषयीची माहिती, तसेच इतर कोणतीही संबंधित माहिती समाविष्ट करावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande