नाशिक, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
तब्बल ९१ हरकती फेटाळात महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाली. ११ जून पासून नाशिक महापालिका प्रशासन प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू होते. अखेर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून अधिसुचिद्वारे प्रभाग रचना जाहीर झाली. आता दिवाळीनंतर मनपा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वपक्षीय माजी नगरसेवक व इच्छुकांच्या तयारीला वेग आला आहे.
प्रशासनाने ३१ प्रभाग रचनेसाठी कार्यक्रम आखत टप्याटप्याने आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कार्यवाही करत शासनाकडे प्रभाग रचनेचा प्रस्ताव पाठवला असता शासनाने तो राज्य निवडणूक आयोगाला २२ सप्टेंबर रोजी सुपूर्द केला होता. यापूर्वीच्या २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग रचनाच असल्याने यंदाही त्याचप्रमाणे प्रभाग रचना ठेवण्यात आली आहे. २९ प्रभागात चार तर दोन प्रभागात तीन सदस्यीय असणार आहे. यंदा चारशे मतदान केंद्राची संख्याने वाढून अठराशे मतदान केद्र असणार आहे. तर पावने चौदा लाख मतदार मतदानाचा हक्क बजवणार आहेत. दरम्यान प्रभागरचना प्रसिद्ध केल्यानंतर शहरातील विविध भागांतून ९१ हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. त्यावर शासनाने नियुक्त केलेले संजय खंदारे, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत महापालिकेत स्सुनावणी घेण्यात आली होती. परंतु सदर हरकती प्रशासनाच्या दुष्टीने महत्वाच्या नसल्याने त्यामुळे प्रभागात बदल करण्याची आवश्यकता वाटली नाही. एकूण १२२ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. अंतिम प्रभागरचना जाहीर होताच खऱ्या अर्थाने मनपा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.
महापालिकेत गेल्या तीन वर्षापासून प्रशासकराज आहे. प्रशासन काळा त रस्त्यावरील खड्डे, पिण्याचे पाणी , आरोग्याच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले. ३ वर्षात विकासकामांच्या मुद्द्यावर आंदोलनाची चर्चा आजही सुरू आहे. मनपासाठी इच्छुक देखील जोरात तयारीला लागले आहेत. आता सर्वांचेच लक्ष निवडणुकीचा कार्यक्रमाकडे लागले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV