रत्नागिरी, 6 ऑक्टोबर, (हिं. स.) : भाजपच्या रत्नागिरी जिल्हा आयटी सेलच्या संयोजकपदी नाचणे जिल्हा परिषद गटामधील भाजपा कार्यकर्ते ओंकार फडके यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपा रत्नागिरी जिल्हा दक्षिण कार्यकारणीच्या सभेत जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या उपस्थितीत चिपळूण विधानसभेचे भाजपाचे नेते प्रशांत यादव यांच्या हस्ते जिल्हा संयोजक आयटी सेलचे नियुक्तीपत्र श्री. फडके यांना देण्यात आले.
ओंकार फडके आयटी क्षेत्रात गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी त्यांची योग्य निवड केली आहे. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांना टेक्नॉलॉजी आत्मसात करण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला.
नाचणे जिल्हा परिषद गटामधे भारतीय जनता पक्ष वाढविण्यात श्री. फडके यांचे बहुमोल योगदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जीएसटी २.० रिफॉर्म अभियानाचे जिल्हा सोशल संयोजकपददेखील यशस्वीरीत्या सांभाळले. त्यांच्या निवडीबद्दल कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी