अमरावती : कोल्ड्रिफ सिरप'चा वापर त्वरित थांबविण्याचे आदेश
विषारी घटक आढळल्याने ''SR-13'' बॅचवरील औषध जप्त करण्याचे आदेशअमरावती, 6 ऑक्टोबर (हिं.स.) मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काही बालकांचा मृत्यू झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने सूचना जारी केली आहे. यात ''कोल्ड्रिफ सिरप'' (Coldrif Syrup) य
कोल्ड्रिफ सिरप'चा वापर त्वरित थांबविण्याचे आदेश विषारी घटक आढळल्याने 'SR-13' बॅचवरील औषध जप्त करण्याचे आदेश


विषारी घटक आढळल्याने 'SR-13' बॅचवरील औषध जप्त करण्याचे आदेशअमरावती, 6 ऑक्टोबर (हिं.स.) मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काही बालकांचा मृत्यू झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने सूचना जारी केली आहे. यात 'कोल्ड्रिफ सिरप' (Coldrif Syrup) या कफ सिरपच्या SR-13 बॅचमध्ये डायइथिलीन ग्लायकोल (Diethylene Glycol - DEG) हा विषारी रासायनिक घटक मिसळलेला आढळला आहे. त्यामुळे औषध जप्त करण्याच्या आदेश देण्यात आले आहे.

राज्यातील नागरिक आणि आरोग्य संस्थांनी या औषधाचा उपयोग त्वरित वापरणे थांबवावे आणि ते तातडीने जप्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे कळविण्यात आले आहे.मे स्त्रेसन फार्मा यांच्या कफ सिरपमध्ये डायइथिलीन ग्लायकोल हा घटक आढळून आला आहे. या रसायनामुळे किडनी आणि यकृताला गंभीर नुकसान पोहोचवून मृत्यू घडवून आणू शकतो.त्यामुळे घरात किंवा दवाखान्यात औषध उपलब्ध असल्यास त्याचे तातडीने वितरण आणि वापर थांबवा. हे औषध लगेच जप्त करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला माहिती द्यावी. यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 222 365, ई-मेल ichq.fda-mah@nic.in, मोबाईल क्रमांक 9892832289 संपर्क साधावा.विक्रेते, वितरक आणि रुग्णालये यांना अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील सर्व औषध निरीक्षक आणि सहायक आयुक्त यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यात कोल्ड्रिफ सिरप, बॅच क्र. SR-13 चा साठा आढळल्यास त्याचे वितरण ताबडतोब थांबवावे. हा संपूर्ण साठा 'गोठवावा' आणि त्याची विक्री, वापर पूर्णपणे थांबवून त्याची माहिती प्रशासनाला द्यावी.अन्न व औषध प्रशासन विभाग या औषधाच्या वितरणाचा मागोवा घेण्यासाठी तामिळनाडू औषध नियंत्रण विभागाशी समन्वय साधत आहे. जनतेने आपल्या घरातील औषधे तपासावीत आणि हा धोका टाळण्यासाठी अत्यंत सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.----------------

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande