परभणी : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन
परभणी, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता शासकीय औद्योगिक प्रश
परभणी : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन


परभणी, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी येथे प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजीत करण्यात आलेला आहे.

राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडून जिल्ह्यातील गरजू सुशिक्षित बेरोजगारांना खाजगी क्षेत्रात नोकरीची एक संधी उपलब्ध व्हावी या हेतूने प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्लेसेमेंट ड्राईव्हमध्ये धुत ट्रान्समिशन, छत्रपती संभाजीनगर व एलआयसी, परभणी या दोन खाजगी आस्थापना सहभाग नोंदविणार आहेत. जिल्ह्यातील बारावी, आयटीआय, डीप्लोमा, पदवी, बी.ई. पॉलिटेक्नीक इत्यादी शैक्षणीक पात्रता धारक उमेदवारांची ट्रेनी ऑपरेटर, अॅप्रेंटशिप ट्रेनी, विमा सल्लागार, विमा सखी इत्यादी पदांसाठी मुलाखातीव्दारे निवड करण्यात येणार आहे.

प्लेसमेंट ड्राईवमध्ये प्रत्यक्ष नावनोंदणी करणेसाठी स्वखर्चाने सर्व उमेदवारांनी उपस्थित राहावे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी प्लसेमेंट ड्राईव्हमध्ये सहभाग नोंदवावा तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 02452-220074 संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त बा.सु.मरे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande