जनसामान्यांना पृथ्वीविषयी सोप्या भाषेत माहिती द्या-डॉ.मिलिंद दुसाने
छत्रपती संभाजीनगर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। पृथ्वी या ग्रहामुळेच आपले अस्तित्व आहे. त्यामुळे त्याविषयी जनसामान्यांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सर्व भूवैज्ञानिकांनी विश्वकोश नोंदीच्या माध्यमातून अधिकृत, विश्वासार्ह आणि सोप्या भाषेत माहिती उ
Q


छत्रपती संभाजीनगर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। पृथ्वी या ग्रहामुळेच आपले अस्तित्व आहे. त्यामुळे त्याविषयी जनसामान्यांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सर्व भूवैज्ञानिकांनी विश्वकोश नोंदीच्या माध्यमातून अधिकृत, विश्वासार्ह आणि सोप्या भाषेत माहिती उपलब्ध करुन द्यावी,असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने यांनी येथे केले.

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि दयानंद महाविद्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था, नागेश्वरवाडी येथे ‘भूविज्ञान लेखकांची नोंदलेखन कार्यशाळा’ संपन्न झाली. विश्वकोशात भूविज्ञान विषयक नोंदींचे लेखन कसे करावे? त्यासाठी विश्वकोश लेखन, तसेच विविध विषयांची निश्चिती यासंदर्भात या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ग्रंथकार संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजशेखर बालेकर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. सतीश देशपांडे, संयोजक, भूविज्ञान नोंदलेखन कार्यशाळा डॉ. पी. एस. कुलकर्णी, प्रा. डॉ. एस. के. वडगबाळकर, डॉ.मुकुंद बरिदे, डॉ.आरती बरिदे, विश्वकोश मंडळाचे विद्याव्यासंगी सहायक रवीन्द्र घोडराज आदी उपस्थित होते.

या कार्यशाळेत विश्वकोशीय लेखन प्रक्रियेत अभ्यासकांचा सहभाग वाढविणे, मराठी भाषेत विज्ञानविषयक लेखनाची दृष्टी विकसित करणे आणि भूविज्ञानासारख्या विषयातील तांत्रिक संकल्पना सुलभ भाषेत मांडणे यावर भर देण्यात आला.

कार्यशाळेत प्रा. डॉ. एस. के. वडगबाळकर व श्री. मोहन मद्वाण्णा यांनी विश्वकोश नोंदीचे महत्त्व, विज्ञानविषयक कोशीय लेखन तंत्र आणि नोंदलेखनाचे विविध टप्पे यावर मार्गदर्शन केले. सहभागी अभ्यासकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रश्नोत्तर सत्रात सक्रिय सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या शेवटी गटचर्चा, अनुभव विनिमय व समारोप सत्र पार पडले. मार्गदर्शक म्हणून मा. डॉ. यु. डी. कुलकर्णी, प्रा. डॉ.आरती बरीदे, डॉ. सुधाकर पंडित, डॉ.पी.एल.साळवे, डॉ. अजित वर्तक आणि डॉ. अरविंद आवटी यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यशाळेस महाराष्ट्रभरातून आलेल्या भूवैज्ञानिक,भू-शास्त्राचे प्राध्यापक ,विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्याव्यासंगी सहायक रवीन्द्र घोडराज यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. कैलास आहेर,डॉ. शरद गायकवाड,डॉ.संदीप सिरसाठ, डॉ. सुरेन कांबळे, योगेश वगदे,गणेश नलावडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालम वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. कैलास आहेर यांनी तर आभार प्रदर्शन संदीप शिरसाठ यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande