मंगेश साबळे यांच्या उपोषण स्थळाला रोहित पवारांची भेट
छत्रपती संभाजीनगर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असताना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी यासह इतर मागण्यांसाठी सरपंच मंगेश साबळे हे गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. राष्ट्
अ


छत्रपती संभाजीनगर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असताना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी यासह इतर मागण्यांसाठी सरपंच मंगेश साबळे हे गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्यासह आमदार रोहित पवार यांनी सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) इथं त्यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या या आंदोलनाला पाठींबा दिला.

शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसलेल्या या सामाजिक कार्यकर्त्याच्या मागण्यांकडं सरकार मात्र दुर्लक्ष करत आहे. त्यांची तब्येत बिघडत चालल्याने सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करून उपोषण तातडीने सोडवावं. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होत

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande