छत्रपती संभाजीनगर, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
आठ दिवसापासून सुरू केलेले उपोषण मागे घेतल्यानंतर सरपंच मंगेश साबळे यांना छत्रपती संभाजी नगर येथील सिद्धेश्वर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे
गेवराई पायगा ता. फुलंब्री येथील सरपंच मंगेश साबळे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर “ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना भरीव मदत व संपूर्ण कर्जमाफी द्यावी” या सारख्या अनेक मागण्यांसाठी सिल्लोड तहसील कार्यालयासमोर मागील आठ दिवसांपासून उपोषण सुरू ठेवले होते.
आज त्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सिद्धेश्वर हॉस्पिटल येथे जाऊन त्यांच्या तब्येतीची काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी विचारपूस केली.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी घेतलेले हे आंदोलन निश्चितच प्रशंसनीय आहे. असे सांगताना खासदार काळे म्हणाले की शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या शासनाने लवकरात लवकर मान्य करून त्यांना दिलासा द्यावा, ही अपेक्षा.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis