छ. संभाजीनगर - सरपंच मंगेश साबळे यांचे उपोषण मंत्री अतुल सावेंनी सोडवले
छत्रपती संभाजीनगर, 6 ऑक्टोबर (हिं.स.) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेवराई पायगाचे सरपंच श्री.मंगेश साबळे यांनी सिल्लोड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होते. सरकारचा प्रतिनिधी म्हणून दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांना योग्य मध्यस्थी करून त्या
अ


छत्रपती संभाजीनगर, 6 ऑक्टोबर (हिं.स.) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेवराई पायगाचे सरपंच श्री.मंगेश साबळे यांनी सिल्लोड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होते. सरकारचा प्रतिनिधी म्हणून दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांना योग्य मध्यस्थी करून त्यांचे उपोषण सोडवण्यात यश आले आहे..

ओला दुष्काळ जाहीर करून एकरी ५० हजार रुपये सरसकट मदत करण्यात यावी, ज्या शेतकऱ्यांची शेतातील माती वाहून गेली आहे त्यांना एकरी १ लाख रुपये मदत करण्यात यावी, ज्या शेतकऱ्याचे जनावर वाहून गेले आहे त्यांना सरसकट ५० हजार रुपये मदत करण्यात यावी, रब्बी हंगामासाठी बी बियाणे व खत शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत..राज्य सरकारकडे याविषयी पाठपुरावा करून त्यांच्या मागण्या सोडवण्यात येतील, असे आश्वासन यावेळी त्यांना दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande