अंबादास दानवेंनी घेतली हिंगोलीतील पदाधिकाऱ्यांची बैठक
हंबरडा मोर्चा ची तयारी
अ


हिंगोली, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हंबरडा मोर्चानिमित्त आज हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नेते अंबादास दानवे यांनी घेतली.

मोर्चा विराट करण्यासाठी विविध सूचना करत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेनेला हा लढा लढावाच लागेल, असे आवाहन यावेळी केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच मराठवाड्यात हंबरडा मोर्चा काढला जाणार आहे या संदर्भात दानवे यांनी या बैठकीत माहिती दिली आहे.

याप्रसंगी शिवसेना उपनेते बबनराव थोरात, सहसंपर्क विनायकराव भिसे, सुनील काळे,जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, गोपू पाटील,माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार संतोष टारपे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande