रायगड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।शिक्षण, संस्कार आणि समाजातील ऐक्याचा संदेश देणारा खरसई आगरी समाज ग्रामस्थ मंडळ, मुंबई आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा फुलपाखरू मैदान, मागाठाणे, बोरीवली येथे मोठ्या दिमाखात पार पडला.
या सोहळ्याला श्रीमती रुक्मिणी घाणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीने शोभा आली. यावेळी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम आणि काउन्सेलिंग सायकोलॉजिस्ट मनोहर जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन दिले. समाजातील ऐक्य, प्रगती आणि संस्कार यांचे महत्व अधोरेखित करत परशुराम मेंदाडकर यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
कार्यक्रमाचे नियोजन महेश घाणेकर यांनी उत्तम प्रकारे केले असून, भरत घाणेकर आणि वरुण घाणेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. मंडळाचे पदाधिकारी परशुराम माळी, मनोज माळी, नारायण मेंदाडकर, यशवंत शितकर, गिरीश पाटील आणि मनोज म्हात्रे यांच्या प्रयत्नामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला.समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. हा सोहळा केवळ गौरवाचा नव्हे, तर समाजातील पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके