कर्जत तालुक्यात पेशवाई मार्गाचे काम मार्गी लागणार
रायगड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।कर्जत तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला आणि खड्डेमय झालेला आंबिवली ते साई मंदिर व साई मंदिर ते दामत रोड या पेशवाई मार्गाचा डांबरीकरण आणि दुरुस्तीचा प्रश्न अखेर मार्गी लागल
आमदार थोरवे– सरपंच विरले यांच्या प्रयत्नांमुळे पेशवाई मार्गाचे काम मार्गी लागणार


रायगड, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।कर्जत तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला आणि खड्डेमय झालेला आंबिवली ते साई मंदिर व साई मंदिर ते दामत रोड या पेशवाई मार्गाचा डांबरीकरण आणि दुरुस्तीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या रस्त्याच्या दुरवस्थेविरुद्ध अनेक वेळा आंदोलन केले, मागण्या मांडल्या, पण विविध कारणांमुळे काम ठप्प राहिले होते.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करणारे सरपंच महेश विरले यांनी या रस्त्याच्या कामासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून आमदार थोरवे यांनी संबंधित विभागाशी समन्वय साधत कामाला मंजुरी मिळवून दिली आहे. त्यामुळे लवकरच या मार्गाचे काम सुरू होणार असल्याची माहिती सरपंच विरले यांनी दिली.

या रस्त्यामुळे नागरिक, शालेय विद्यार्थी आणि वाहनधारकांना अनेक वर्षे त्रास सहन करावा लागला होता. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला होता. या कामाला मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह आणि समाधानाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी आमदार महेंद्र थोरवे आणि सरपंच महेश विरले यांच्या अथक प्रयत्नांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत. पेशवाई मार्गाचे डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील संपर्कव्यवस्था सुधारेल, स्थानिक व्यापाराला गती मिळेल आणि गावाचा सर्वांगीण विकास साध्य होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande