परभणी, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होण्याच्या शताब्दी पूर्ती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विजयादशमी निमित्त शस्त्रपूजन आणि पथसंचालन कार्यक्रम तालुका सेलूत आज श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर येथे पार पडला.
कार्यक्रमात संघाच्या गणवेशधारी स्वयंसेवकांचा सघोष पथसंचलन मंदिरापासून सुभेदार गल्ली, फुलारी गल्ली, मारवाडी गल्ली, बन्सीलाल नगर कॉर्नर, सारंग गल्ली, मठ गल्ली, मोंढा, क्रांती चौक मार्गे परत मंदिरापर्यंत करण्यात आला.
कार्यक्रमास सेलू शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सतीश एकनाथराव लिपणे उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून श्री सचिन कोंडेकर मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमात असंख्य गणवेशधारी स्वयंसेवकांबरोबर सर्वसामान्य नागरिक आणि महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. तालुका कार्यवाह विकास पिंगळे यांनी याबाबत माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis