परभणी शहरातील पाणीपुरवठा ७-८ ऑक्टोबर दरम्यान बंद
परभणी, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। परभणी शहरातील जिंतूर रोडवरील वळण रस्त्याच्या (बायपास) कामाच्या दरम्यान ९०० मिमी व्यासाची पाईपलाईन फुटल्याने येलदरी धरणातून परभणी शहराला होणारा पाणीपुरवठा ७ व ८ ऑक्टोबर या दोन दिवस बंद राहणार आहे. महानगरपालिका प्रश
परभणी शहरातील पाणीपुरवठा ७-८ ऑक्टोबर दरम्यान बंद


परभणी, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।

परभणी शहरातील जिंतूर रोडवरील वळण रस्त्याच्या (बायपास) कामाच्या दरम्यान ९०० मिमी व्यासाची पाईपलाईन फुटल्याने येलदरी धरणातून परभणी शहराला होणारा पाणीपुरवठा ७ व ८ ऑक्टोबर या दोन दिवस बंद राहणार आहे.

महानगरपालिका प्रशासनाने कळवले आहे की, पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे आणि दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत सुरू केला जाईल.

शहरातील नागरिकांना वेळोवेळी माहिती देण्यात येणार असून, महानगरपालिका प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande