अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला पुणे पोलिसांकडून क्लीन चिट
पुणे, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कारने ३० सप्टेंबरला वडगाव बुद्रुकजवळ रिक्षाला धडक देणाऱ्या अपघातप्रकरणात पुणे पोलिसांनी तिला पूर्णपणे क्लीन चिट दिली आहे. अपघातावेळी गौतमी वाहनात नव्हती, फक्त चालक उपस्थित होता, असा
गौतमी पाटील


पुणे, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कारने ३० सप्टेंबरला वडगाव बुद्रुकजवळ रिक्षाला धडक देणाऱ्या अपघातप्रकरणात पुणे पोलिसांनी तिला पूर्णपणे क्लीन चिट दिली आहे. अपघातावेळी गौतमी वाहनात नव्हती, फक्त चालक उपस्थित होता, असा निष्कर्ष निघाला असून, या निष्कर्षासाठी पोलिसांनी १०० हून अधिक CCTV फुटेज तपासले.

रिक्षाचालक समाजी विठ्ठल मारगळे (४४) गंभीर जखमी झाला असून, तो दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेने गौतमीवर राजकीय आणि सोशल मीडिया वाद उफाळला होता, पण आता पोलिसांच्या तपासाने तिला मोठा दिलासा मिळाला आहे.

पुणे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी स्पष्ट केलं की, अपघातावेळी गौतमी पाटील वाहनात नव्हती. अपघातस्थळापासून भोरपर्यंतच्या ४०-५० ठिकाणी असलेल्या १०० हून अधिक CCTV फुटेजचा तपास केला. त्यात फक्त चालक वाहन चालवत असल्याचं दिसतंय.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande