नीलेश घायवळच्या घरातून काडतुसे जप्त
पुणे, 6 ऑक्टोबर (हिं.स.)। कोथरूड गोळीबार प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर परदेशात पसार झालेला गुंड नीलेश घायवळच्या घरातून पोलिसांनी दोन काडतुसे, तसेच चार पुंगळ्या जप्त केल्या. या प्रकरणी घायवळ व
नीलेश घायवळच्या घरातून काडतुसे जप्त


पुणे, 6 ऑक्टोबर (हिं.स.)।

कोथरूड गोळीबार प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर परदेशात पसार झालेला गुंड नीलेश घायवळच्या घरातून पोलिसांनी दोन काडतुसे, तसेच चार पुंगळ्या जप्त केल्या. या प्रकरणी घायवळ विरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शस्त्र अधिनियम १९५१ चे कलम ५, ७, २५ (१), २७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्री संत ज्ञानेश्वर काॅलनीतील घायवळच्या घरी पोलिसांचे पथक पोहोचले. त्याच्या घरातील कपाटातून दोन काडतुसे आणि चार पुंगळ्या जप्त करण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पटारे, कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक नेमाणे तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande