नाशिक - नगराध्यक्ष पदासाठी 6 जण इच्छुक
नाशिक, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)त्र्यंबकेश्वर नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी आरक्षण पडले आहे. यामुळे जनरल मधून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक मंडळींची निराशा झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी प्रथमदर्शनी सहा जण इच्छुक आहेत. नगराध्यक्ष ओबीसी आरक्षण पडल्याने ओब
नाशिक - नगराध्यक्ष पदासाठी 6 जण इच्छुक


नाशिक, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)त्र्यंबकेश्वर नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी आरक्षण पडले आहे. यामुळे जनरल मधून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक मंडळींची निराशा झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी प्रथमदर्शनी सहा जण इच्छुक आहेत. नगराध्यक्ष ओबीसी आरक्षण पडल्याने ओबीसी मंडळींकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे.

ओबीसी मध्ये ओबीसी पुरुष अथवा स्त्री महिला दोन्हीही निवडणूक लढवू शकतात. नगराध्यक्षपदासाठी हवा भरली जात आहे. दरम्यान राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष व्हावा यासाठी मंत्री छगन भुजबळ हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस त्रंबक कडे लक्ष घालीत असल्याचे वृत्त आहे. तर मंत्री गिरीश महाजन हे देखील भाजपकडे सता यावी या साठी लक्ष घालत आहे असे समजते आजमितीस एका महिलेसह नगराध्यक्ष पदसाठी 6 इच्छुक आहेत, अशी माहिती समोर येत आहे.

निवडणूक विभाग मतदार यादी होणार आठ तारखेला प्रसिद्ध. त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय मतदार यादी आठ तारखेला प्रसिद्ध होणार आहे. प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर नागरिकांना हरकती व सूचना13 तारखेपर्यंत घेता येतील. त्यानंतर 28 रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

आठ ऑक्टोबर रोजी निवडणूक सदस्य आरक्षण सोडत काढली जाणार आहे त्रंबकेश्वर नगरपालिकेत अशी सोडत काढली जाईल.सदस्य आरक्षण कळेल.

अशी माहिती नगरपालिका निवडून विभागाकडून देण्यात आली. सकाळी 11 वाजता सोडत या साठी असलेल्या नियमानुसार काढली जाणार आहे.त्र्यंबक नगरपालिकेत सभागृहात सोडत काढले जाईल. सोडत नागरिकांना उपस्थित राहून पाहता येईल. नऊ तारखेला आरक्षण प्रसिद्ध केले जाईल. दिनांक 9 ते 14 या काळात यावर हरकती व सूचना नगरपालिकेत घेता येईल.नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल पाटील यांनी वरील संदर्भाने माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande