अकोल्यात 'टीडीएस' बाबत प्राप्तीकर विभागाच्या वतीने कार्यशाळा
अकोला, 7 ऑक्टोबर (हिं.स.) : प्राप्तीकर विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे लेखा विभाग, उपकोषागार कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी यांच्याकरिता टीडीएस विषयावर कार्यशाळा आज घेण्यात आली. सर्वांनी वेळेवर टीडीएस भरण्याचे व त्याचे
P


अकोला, 7 ऑक्टोबर (हिं.स.) : प्राप्तीकर विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे लेखा विभाग, उपकोषागार कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी यांच्याकरिता टीडीएस विषयावर कार्यशाळा आज घेण्यात आली. सर्वांनी वेळेवर टीडीएस भरण्याचे व त्याचे विवरण वेळेवर दाखल करण्याचे आवाहन यावेळी प्राप्तीकर अधिकारी सुवर्णा शेवाळकर यांनी केले. यावेळी प्राप्तीकर विभागाचे विकास कुमार (प्राप्तीकर अधिकारी),संजय वानखेडे ( प्राप्ती कर निरीक्षक ),प्रदीप मीना (कर सहायक)रामकृष्ण तिवळे (कर सहायक) शिवम सिंग (एम.टी.एस) आदी उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये प्राप्तीकर कायदा 194A,184C,194 H,194 I,194J पॅन आधारित टीडीएस,आधार लिंकिंग याबाबत माहिती देण्यात आली. टीडीएस विषयाची माहिती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे समजावून सांगण्यात आली.कार्यशाळेला जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande