'त्या' कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी- मिटकरी
अकोला, 7 ऑक्टोबर (हिं.स.)।प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाला फेकून देण्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.या घटनेचा महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचा अपमान असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस ( अ. प ) चे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र शब्दांत निषेध
'त्या' कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी- मिटकरी


अकोला, 7 ऑक्टोबर (हिं.स.)।प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाला फेकून देण्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.या घटनेचा महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचा अपमान असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस ( अ. प ) चे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.प्रबोधनकार ठाकरे हे महाराष्ट्राच्या विचारप्रवर्तक परंपरेचे प्रतीक आहेत. त्यांचं पुस्तक फेकण्याचं कृत्य म्हणजे फक्त त्यांचा नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी विचारांचा अपमान आहे आल्याचं मिटकरी म्हणाले.तर केलेल्या कृत्यावर नर्स संघटना अजूनही ठाम असून हा प्रबोधनकारांचा नव्हे तर पुरोगामी चळवळीचा अपमान असल्याचा दावा त्यांनी केला आहे.अमोल मिटकरी यांनी या घटनेत सामील परिचारिकेचे निलंबन करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच, नर्सवर कारवाई न झाल्यास आगामी अधिवेशनात नर्स संघटनेला कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही मिटकरींनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande