अकोला, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। नागरिकांसाठी सणासुदीचा काळ आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी, आपल्या गावी जाण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो. परंतु नेमक्या याच कालावधीत खाजगी बसवाल्यांकडून तिकीट दरांमध्ये अनेक पटींनी वाढ केली जाते. यामुळे शिक्षणनिमित्त बाहेरगावी असणाऱ्या विद्यार्थ्यांची, नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होते. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक उपाय योजना कराव्या यासाठी दिनांक ७ सप्टेंबर २०२५ या दिवशी सुराज्य अभियानच्या वतीने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात सुराज्य अभियान कडून पुढीलप्रमाणे मागण्या व सूचना करण्यात आल्या -
१. सर्व मार्गांवरील ऑन लाईन व ऑफ लाईन बस तिकीट दरांचे निरीक्षण करण्यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा.
2. सर्व प्लॅटफॉर्म्स ( रेड बस, मेक माय ट्रिप इत्यादी) व ऑपरेटर्स नी शासनाने ठरविलेल्या १.५ पट दरमर्यादेचे पालन अनिवार्य करावे.
3. तिकीट दरवाढीबाबत तसेच खाजगी बस ऑपरेटर आणि om लाईन तिकिट बुकिंग प्लॅटफॉर्म्स बाबत तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांना व्हॉट्सअँप हेल्प लाईन व ऑन लाईन तक्रार पोर्टल उपलब्ध करून द्यावे आणि त्यांची प्रसिद्धी करावी.
4. करार वाहन परवान्याच्या अंतर्गत स्वतंत्र तिकिटांची विक्री आणि एकाच बसमध्ये वेगवेगळे तिकीटदर टाळावे, कारण असे करणे मोटार वाहन कायदा,१९८८ च्या कलम २(७) नुसार बेकायदेशीर ठरते.
5. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑपरेटर्स, एजंट्स व प्लॅटफॉर्मसविरुद्ध तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
6. सर्व जिल्हा परिवहन कार्यालयांकडून सणासुदीच्या काळातील दरवाढीचे दर प्रत्येक आठवड्यानंतर अहवाल स्वरूपात संकलित करावे.
रवींद्र भुयार यांनी या प्रसंगी आश्वासन दिले की त्यांच्या कार्यालयाकडून आवश्यक त्या सर्व सूचना निर्गमित केल्या जातील. स्वतंत्र scod नेमून मॉनिटरिंग केले जाईल व दरवाढीचे नियम मोडणाऱ्या संबंधितांवर कारवाई केली जाईल. तसेच २०१८ च्या शासन निर्णयानुसार १.५ पट भाडे आकारण्यासंदर्भातील नियमांचे पालन केले जाईल. यासंदर्भात प्रेस नोट काढण्याची सूचनाही भुयार यांनी संबंधित अधिकाऱ्याला दिली.
या प्रसंगी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष एम.के. दिवनाले, राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीच्या अधिवक्त्या दीपाली जानोरकर, सौ.कमल रोठे, राधिका भोपळे, सुराज्य अभियान जिल्हा समन्वयक श्रीमती श्रुती भट, अजय खोत या उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे