भुसावळ–वर्धा तिसरी-चौथी रेल्वे मार्गाला मंजुरी
अकोला, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्क आणखी सक्षम करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचा सातत्याने विकासाला दिशा देण्याचे काम असल्याच्या कृतीने पंतप्रधान नरेंद्र मोद
P


अकोला, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्क आणखी सक्षम करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचा सातत्याने विकासाला दिशा देण्याचे काम असल्याच्या कृतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव व रेल्वे बोर्डाने भुसावळ–वर्धा तिसरी आणि चौथी रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.

या प्रकल्पामुळे मुंबई–हावडा या देशातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील वाहतुकीवरील ताण कमी होणार असून, अतिरिक्त प्रवासी गाड्यांचे संचालनही शक्य होणार आहे. व नवीन गाड्या सुरू होण्यास व सुविधा मिळण्यास गती मिळेल. दळणवळण सुविधेत वाढ होईल.

या प्रकल्पाची एकूण लांबी 314 किलोमीटर असून, यावर अंदाजे ₹9,197 कोटींचा खर्च होणार आहे. या मार्गावर 72 रोड ओव्हर/अंडर ब्रिज आणि 1 रेल ओव्हर रेल ब्रिज बांधण्यात येणार आहेत.

या प्रकल्पामुळे जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा यवतमाळ हिंगोली हे जिल्हे लाभान्वित होणार आहेत. रेल्वे मार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे निर्माण होणारा अडथळा कमी होऊन गाड्यांच्या वेळापत्रकात सुधारणा होईल. तसेच पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.

याशिवाय या प्रकल्पामुळे 45 कोटी किलो CO₂ उत्सर्जनात घट होणार असून, ही घट 1.8 कोटी झाडे लावल्यासारखीच परिणामकारक ठरेल. या संदर्भात खासदार अनुप धोत्रे यांनी मुख्य पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे बोर्ड तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आभार मानले आहे तसेच आपले सहकारी आमदार रणधीर सावरकर आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकळे आमदार वसंत खंडेलवाल यांची विकास कामाला योग्य सहकार्य असल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.

रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरच्या विस्तारामुळे महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम होईल आणि राज्याच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल. असा विश्वास खासदार धोत्रे यांनी व्यक्त केला

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande