हिंगोली - वसमत व कळमनुरी येथील आयटीआयमध्ये अल्पमुदतीचे नवीन कोर्स सुरु
हिंगोली, 7 ऑक्टोबर, (हिं.स.) - हिंगोली जिल्ह्यातील 6 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण वेगवेगळ्या ट्रेडचे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत. त्यापैकी वसमत व कळमनुरी आयटीआयमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अल्पमुदतीचे 7 कोर्स दि. 8 ऑक्टोबर, 2025 पासून चालू
हिंगोली - वसमत व कळमनुरी येथील आयटीआयमध्ये अल्पमुदतीचे नवीन कोर्स सुरु


हिंगोली, 7 ऑक्टोबर, (हिं.स.) - हिंगोली जिल्ह्यातील 6 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण वेगवेगळ्या ट्रेडचे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत. त्यापैकी वसमत व कळमनुरी आयटीआयमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अल्पमुदतीचे 7 कोर्स दि. 8 ऑक्टोबर, 2025 पासून चालू होणार आहेत. त्यामध्ये 30 विद्यार्थ्यांची एक बॅचद्वारे कोर्स पूर्ण करण्यात येणार आहेत. कोर्स पूर्ण केलेल्या युवकांना औद्योगिक क्षेत्रात रोजगार अथवा स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्यास मदत होणार आहे.

वसमत आयटीआयमध्ये पहिल्या टप्प्यात दुचाकीसंबंधी, फिल्ड टेक्नीशियन, सौर पॅनलशी संबंधित आणि डिजिटल मित्र हे अल्पमुदतीचे कोर्स सुरु होणार आहेत. कळमनुरी आयटीआयमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये होम अल्पायंसेस, डिजिटल मित्र व शिवणकामाशी संबंधित कोर्स सुरु होणार आहेत.

या विविध अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाचे राज्यामध्ये दि. 8 ऑक्टोबर रोजी एकाच वेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे.

त्याअनुषंगाने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी www.msbvet.edu.in या संकेतस्थळावर ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाची विस्तृत माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तसेच अधिक माहितीसाठी वसमत आयटीआयमधील टी. जे. झाड (मो.7975837789) व सचिन पडघन (मो. 8530418404) यांच्याशी आणि कळमनुरी आयटीआयमधील डी. जे. गायकवाड (मो. 8788966841) व चैतन्य कुदळे (मो. 9503030584) यांच्याशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त युवक, युवती व बेरोजगार तरुणांनी या संधीचा लाभ घेऊन अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाचा कोर्स पूर्ण करावा, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande