कोलंबोहून चेन्नईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला धडकला पक्षी
चेन्नई, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)एअर इंडियाच्या कोलंबो-चेन्नई विमानाच्या इंजिनला पक्षी धडकला आणि विमानाचे इंजिन खराब झाले. सुरक्षेच्या कारणास्तव एअरलाइनने चेन्नईहून कोलंबोला परतण्याचे विमान तात्पुरते रद्द केले आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की, चेन्
एअर इंडिया विमानाचा संग्रहित फोटो


चेन्नई, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)एअर इंडियाच्या कोलंबो-चेन्नई विमानाच्या इंजिनला पक्षी धडकला आणि विमानाचे इंजिन खराब झाले. सुरक्षेच्या कारणास्तव एअरलाइनने चेन्नईहून कोलंबोला परतण्याचे विमान तात्पुरते रद्द केले आहे.

विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की, चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरण्याच्या तयारीत असताना पक्षी विमानाच्या इंजिनला धडकला आणि आवाज झाला. त्यानंतर वैमानिकाने चेन्नई विमानतळावर विमान उतरवले.

घटनेच्या वेळी विमानात १५८ प्रवासी होते. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव विमान ग्राउंड करण्यात आले आहे, म्हणजेच पुढे उड्डाण करण्याची परवानगी नाही.

त्यांनी सांगितले की, एअरलाइनने १३७ प्रवाशांसाठी दुसरे विमान आयोजित केले होते. जे नंतर कोलंबोला रवाना झाले. एअर इंडियाची तांत्रिक टीम विमानाचे किती नुकसान झाले आहे याची चौकशी करत आहे. विमानतळ प्राधिकरण आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय देखील या घटनेचा अहवाल तयार करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande