मुख्यमंत्री सहायता निधीला नंदकिशोर मुंदडा यांच्या वतीने ३२ लाखांची मदत
बीड, 7 ऑक्टोबर (हिं.स.)।मुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांच्या वाढदिवसानिमित्त जमा झालेल्या ३२,८४,८४०/- रुपये रकमेच्या निधीचा धनादेश केज विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार नमित
अ


बीड, 7 ऑक्टोबर (हिं.स.)।मुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांच्या वाढदिवसानिमित्त जमा झालेल्या ३२,८४,८४०/- रुपये रकमेच्या निधीचा धनादेश केज विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत करण्याच्या उद्देशाने, नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू न घेता मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.या आवाहनाला प्रतिसाद देत इच्छादानपेटीतून एकूण ३२,८४,८४० रुपये जमा झाले आणि ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सुपूर्त करण्यात आली.त्यापैकी एक धनादेश ३१,८४,८४० रुपयांचा असून, दुसरा स्वतंत्र धनादेश १,००,००० रुपयांचा होता. एकूण रक्कम ३२,८४,८४० रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आली आहे.

मुंबई मंत्रालयात महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री.देवेंद्र फडणवीस यांना धनादेश सुपूर्त करण्यात आले. याप्रसंगी ,आदरणीय नंदकिशोर काकाजी मुंदडा व अक्षय मुंदडा उपस्थित होते.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande