पंजाबमध्ये 'कोल्ड्रिफ' कफ सिरपवर बंदी
चंदीगड, ७ ऑक्टोबर, (हिं.स.): पंजाब सरकारने राज्यात ''कोल्ड्रिफ'' कफ सिरपच्या विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. मध्य प्रदेशात या सिरपच्या वापरामुळे १७ मुलांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला. आरोग्य विभाग संचालनालयाने या संदर्भात आदेश
कप सिरप संग्रहित फोटो


चंदीगड, ७ ऑक्टोबर, (हिं.स.): पंजाब सरकारने राज्यात 'कोल्ड्रिफ' कफ सिरपच्या विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. मध्य प्रदेशात या सिरपच्या वापरामुळे १७ मुलांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला. आरोग्य विभाग संचालनालयाने या संदर्भात आदेश जारी केले. जे राज्यातील सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले.

सरकारी आदेशात असे म्हटले आहे की, पंजाबमधील सर्व किरकोळ विक्रेते, वितरक, नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी, रुग्णालये आणि आरोग्य सेवा संस्था हे उत्पादन खरेदी, विक्री किंवा वापरणार नाहीत. तामिळनाडूमध्ये उत्पादित केलेल्या या सिरपवर डायथिलीन ग्लायकोलच्या भेसळीमुळे बंदी घालण्यात आली आहे. आदेशात असे म्हटले आहे की, मध्य प्रदेश अन्न आणि औषध प्रशासनाच्या औषध चाचणी प्रयोगशाळेने ४ ऑक्टोबर रोजी एक अहवाल जारी केला होता. ज्यामध्ये असे म्हटले होते की, कोल्ड्रिफ सिरप हे औषध निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले.

कोल्ड्रिफ सिरप तामिळनाडूच्या कांचीपुरममध्ये तयार केले जाते. हे सिरप मे २०२५ मध्ये तयार करण्यात आले होते आणि एप्रिल २०२७ मध्ये त्याची मुदत संपत आहे. या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल या विषारी रसायनाची भेसळ असल्याचे आढळून आले आहे, जे गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकते. पंजाबमधील सर्व मेडिकल स्टोअर्स, वितरक, डॉक्टर आणि रुग्णालयांनी हे औषध विकू नये, खरेदी करू नये किंवा वापरू नये. जर हे सिरप राज्यात कुठेही उपलब्ध असेल तर ताबडतोब पंजाब अन्न आणि औषध प्रशासनला ईमेलद्वारे कळवा असे सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande