बी. आर. गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा अमरावती जिल्हा वकील संघाकडून निषेध
अमरावती, 7 ऑक्टोबर, (हिं.स.) - मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या न्यायालयात एका व्यक्तीने पायातील जोडा काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी तत्काळ त्या व्यक्तीस अडवून ताब्यात घेतले. ही घटना भ
भ्याड हल्ल्याचा निषेध: अमरावती जिल्हा वकील संघाचा ठराव एकमुखाने मंजूर


अमरावती, 7 ऑक्टोबर, (हिं.स.) - मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या न्यायालयात एका व्यक्तीने पायातील जोडा काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी तत्काळ त्या व्यक्तीस अडवून ताब्यात घेतले. ही घटना भारताच्या न्यायव्यवस्थेस कलंक लावणारी असून, संपूर्ण देशासाठी ही एक काळाकुट्ट आणि लाजिरवाणी घटना ठरली आहे. या घटनेचा अमरावती जिल्हा वकील संघाने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, आजच्या विशेष बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूर करून हा निषेध नोंदवण्यात आला आहे.

वकील संघाच्या मते, धार्मिक भावना भडकावून न्यायालयासारख्या पवित्र स्थळी अशा प्रकारचा हल्ला करणे हा लोकशाही व कायद्याच्या राजवटीवर आघात आहे.वकील संघाने संबंधित आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली असून, अशा मानसिकतेच्या मुळाशी जाऊन त्याचे उच्चस्तरीय विश्लेषण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले आहे.

अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande