छत्रपती संभाजीनगर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)।संविधान आणि न्यायव्यवस्थेचा अपमान असह्य असल्याची प्रतिक्रिया लोकसभा काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर चप्पल भिरकावण्याचा निषेधार्ह प्रकार करणाऱ्या मनुवादी वकील राकेश किशोर यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर काँग्रेस कमिटी तर्फे प्रतीकात्मक प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.हा प्रकार केवळ न्यायसंस्थेचा नाही तर भारतीय संविधानाचा अपमान आहे.काँग्रेस पक्ष नेहमीच न्याय, समानता आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी ठामपणे उभा राहिला आहे आणि राहील.
----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis