छत्रपती संभाजीनगर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)।मराठवाडाव्यापी हंबरडा मोर्चानिमित्त धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज पवनराजे कॉम्प्लेक्स, धाराशिव येथे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. अंबादास दानवेयांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत शिवसेनेची मागणी आणि भूमिका पोहचली पाहिजे. शेतकऱ्यांची परिस्थिती कठीण आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश असून पंजाब सरकार प्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी बळीराजाला अपेक्षा आहे.
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांबाबत निष्ठूर भूमिका न घेता नुकसान भरपाई आणि कर्जमुक्ती व्हावी, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मराठवाडाव्यापी हंबरडा मोर्चानिमित्त धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज पवनराजे कॉम्प्लेक्स, धाराशिव येथे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीस खासदार ओम राजे निंबाळकर,आमदार प्रवीण स्वामी,सहसंपर्कप्रमुख नंदू भैय्या राजेनिंबाळकर,जिल्हाप्रमुख रणजीत पाटील तसेच सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, अपुरे पंचनामे शासनाच्या निष्क्रिय भूमिकेचा तीव्र निषेध या बैठकीत व्यक्त करण्यात आला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरून ठाम भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis