बीड, 7 ऑक्टोबर (हिं.स.)।गेवराई विधानसभा मतदार संघातील विविध विषयांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांची भेट घेतली. यावेळी गेवराई शहरात ‘रेशीम पार्क' निर्मिती बाबत कृती आराखडा तयार करणे संदर्भात चर्चा केली. गेवराई शहरातील संजयनगर येथील सर्व्हे नं.१/१ मधील पोलिस विभागाच्या जागेवरील ४१६ आणि भटक्या विमुक्त जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवरील २१८ भूखंड धारकांचे अतिक्रमण नियमाकुल करून त्यांना हक्काचा पीटीआर देणे संदर्भात चर्चा केली. जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ मधील प्रस्तावित कामांच्या मंजुरी संदर्भात चर्चा केली. या सर्व मुद्यांच्या अनुषंगाने अतिशय सकारात्मक चर्चा होऊन लोकाभिमुख निर्णय करण्यात आले. या बैठकीला आमदार श्री. विजयसिंह पंडित यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी श्री. शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी समन्वयक श्री. सतिष धुमाळ, तहसिलदार श्री. संदिप खोमणे, जिल्हा नियोजन अधिकारी यांचे प्रतिनिधी, नगर पालिका प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त श्री. संभाजी वाघमारे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis