लातूर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। पुणे येथील ज्ञानदीप समाज विकास संस्था यांच्या संचलनाखालील करिअर डेव्हलपमेंट ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे माजी सैनिकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. माजी सैनिकांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असल्यास त्यांना फोनद्वारे समुपदेशन करून प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती करिअर डेव्हलपमेंट ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे यांनी दिली आहे.
तरी 35 ते 40 वयोगटातील इच्छुक माजी सैनिकांनी आपले डिस्चार्ज बुक आणि ओळखपत्र घेऊन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis