सोलापूर, 7 ऑक्टोबर (हिं.स.) : कृषि समृद्धी योजनेंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यास एकूण रु. ५१९४.०० लाख निधीची मंजुरी प्राप्त झाली आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी रु. ४१३५.४२ लाख, अनुसूचित जातीसाठी रु. ९९१.१८ लाख व अनुसूचित जमातीसाठी रु. ६७.४० लाख इतका निधी उपलब्ध आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना खालील घटकांचा लाभ घेता येणार आहे ड्रॅगन फ्रुट, अॅव्होकॅडो, सुटटी फुले, मसाला पिके- फळांना कव्हर, तण नियंत्रक आच्छादन- सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण- ट्रॅक्टर, पावर टिलर, इतर औजारे- पॅक हाऊस, कांदाचाळ, प्राथमिक प्रक्रिया केंद्र- रेफर व्हॅन, शीतगृह, शीतसाखळी, शीतखोली- रायपनिंग चेंबर, लागवड साहित्य, फळबाग पुनर्जीवन- मधुमक्षिक पालन, आळिंबी उत्पादन केंद्र- हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग इत्यादी लाभार्थी निवडीचे निकष :- शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक- फलोत्पादन क्षेत्रातील पिके (फळे, भाजीपाला, फुले इ.) असणे आवश्यक सोलापूर जिल्ह्यातील सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांनी वरील घटकांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड