परभणी, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। जिंतूर विधानसभा मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद सदस्य संजय साडेगांवकर, ओबीसी समाजाचे नेते नानासाहेब राऊत, अविनाश काळे यांच्यासह बोरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र नागरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या नेते मंडळींचे पक्षात स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर, पक्षाचे सरचिटणीस आमदार संजय केणीकर, जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यासह अन्य उपस्थित होते. यातील काहीजण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यरत होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis