अमरावती, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी पॅकेजवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी असमाधान व्यक्त केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. राज्य सरकारच्या निषेधार्थ शेतकरी रस्त्यावर उतरले असून, संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांची तातडीने कर्जमाफी करा अशी जोरदार मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
आंदोलनादरम्यान महिलांनी रस्त्यावर सोयाबीन जाळून आणि बांगड्या फेकून तीव्र संताप व्यक्त केला. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शेतकरी महिलांनी राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर बांगड्या फेकत पुतळा जाळून निषेध केला. बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं पॅकेज हे बनवाबनवीचं असल्याचा आरोप केला.या आंदोलनाचं पुढचं पाऊल म्हणून 28 तारखेला नागपूरमध्ये मोठं आंदोलन होणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी