अनुसूचित जमात प्रवर्गात समावेशाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा परभणीत मोर्चा
परभणी, 7 ऑक्टोबर, (हिं.स.) - बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करावे, या प्रमुख मागणीसाठी परभणी शहरात भव्य आणि शांततामय मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात हजारो समाजबांधवांनी सहभाग घेतला असून, विशेष म्हणजे महिलांची उपस्थित
अनुसूचित जमात प्रवर्गात समावेशाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा परभणीत प्रचंड मोर्चा


परभणी, 7 ऑक्टोबर, (हिं.स.) - बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करावे, या प्रमुख मागणीसाठी परभणी शहरात भव्य आणि शांततामय मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात हजारो समाजबांधवांनी सहभाग घेतला असून, विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. पारंपारिक पोशाख आणि दागदागिने परिधान केलेल्या महिलांच्या सहभागामुळे संपूर्ण मोर्चा सांस्कृतिक रंगांनी न्हाऊन निघाला.

मोर्चाची सुरुवात शहरातील जिंतूर रोड परिसरातून मोठ्या उत्साहात झाली आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन संपन्न झाला. समाजबांधवांनी हातात फलक, बॅनर, तसेच “बंजारा समाजाला न्याय द्या, एसटी प्रवर्गात समावेश करा!” अशा घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले.

या प्रसंगी नेत्यांनी सांगितले की, “बंजारा समाज शतकानुशतके सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास राहिला आहे. शासनाने अनेकदा आश्वासन दिले, मात्र ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत.”

मोर्चाचे स्वरूप शिस्तबद्ध आणि शांततामय होते. जिल्हाधिकारी यांना समाज प्रतिनिधींनी निवेदन सादर करून मागणी मान्य करण्याचे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande