रा. स्व. संघाचे जे. नंदकुमार यांची गुरुकुंज आश्रमाला सदिच्छा भेट
अमरावती, 7 ऑक्टोबर, (हिं.स.) | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्या असल्याने. संपूर्ण भारतभर संघाच्या वतीने भव्य प्रमाणात पथसंचालन व श्री विजयादशमीच्या कार्यक्रमाचे जिल्हा स्थान ,तालुका स्थान व ग्राम शाखेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन सुरू
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  जे. नंदकुमार जी यांची गुरुकुंज आश्रमाला सदिच्छा भेट


अमरावती, 7 ऑक्टोबर, (हिं.स.) | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्या असल्याने. संपूर्ण भारतभर संघाच्या वतीने भव्य प्रमाणात पथसंचालन व श्री विजयादशमीच्या कार्यक्रमाचे जिल्हा स्थान ,तालुका स्थान व ग्राम शाखेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे. या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रज्ञा प्रवाहाचे अखिल भारतीय संयोजक जे. नंदकुमार हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा 57 वा पुण्यतिथी महोत्सव सुरु असताना गुरुकुंज आश्रमाला भेट दिली व समाधी स्थळाचे दर्शन घेत, आश्रम परिसराची माहिती जाणून घेतली.

यावेळी राष्ट्रसंतांच्या राष्ट्रीय विचारांनी भारावून गेले.याप्रसंगी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंथ बोथे गुरुजी, डॉ. राजारामजी बोथे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री रुपेश राऊत, धीरजजी इंगळे, शुभम जी बोथे आधी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande