जळगाव : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक येथे बदली
जळगाव, 7 ऑक्टोबर, (हिं.स.) | राज्य सरकारकडून आज १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक येथे बदली झाली आहे. आता त्यांच्या जागी आता ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे हे
जळगाव : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक येथे बदली


जळगाव, 7 ऑक्टोबर, (हिं.स.) | राज्य सरकारकडून आज १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक येथे बदली झाली आहे. आता त्यांच्या जागी आता ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे हे नवीन जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील. याबाबतचे आदेश आज निर्गमीत करण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande