रायबरेलीतील तरुणाच्या हत्येप्रकरणी खर्गे आणि राहुल गांधींकडून संयुक्त निवेदन जारी
नवी दिल्ली, ७ ऑक्टोबर (हिं.स.) : रायबरेलीतील हरिओम वाल्मिकी या दलित तरुणाच्या हत्येने आता राजकीय रंग घेतला आहे. ही त्या म्हणजे संविधान, सामाजिक न्याय आणि मानवतेच्या मूलभूत भावनेवर हल्ला असल्याचे काँग्रेसने म्हंटले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिक
मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी


नवी दिल्ली, ७ ऑक्टोबर (हिं.स.) : रायबरेलीतील हरिओम वाल्मिकी या दलित तरुणाच्या हत्येने आता राजकीय रंग घेतला आहे. ही त्या म्हणजे संविधान, सामाजिक न्याय आणि मानवतेच्या मूलभूत भावनेवर हल्ला असल्याचे काँग्रेसने म्हंटले आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संयुक्त निवेदन जारी करून म्हटले आहे की, रायबरेलीतील घटना ही देशाच्या संवैधानिक चौकटी आणि लोकशाही आदर्शांच्या विरोधात आहे. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला समानता, सुरक्षा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हमी देते. काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, ते समाजातील वंचित, असुरक्षित आणि पीडित घटकांच्या सक्षमीकरणासाठी वचनबद्ध आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande