नंदुरबार, 7 ऑक्टोबर, (हिं.स.) दिनांक 05 ऑक्टोंबर ते 12 ऑक्टोंबर, 2025 या कालावधीत माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्यात येत असून या सप्ताहानिमित्त 9 ऑक्टोंबर, 2025 रोजी दुपारी 4.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे राज्य माहिती आयोग नाशिक खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रास जिल्ह्यातील सामान्य नागरिक, माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर