वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूचा विजय
मनमाड, 7 ऑक्टोबर (हिं.स.) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्यातर्फे राबविण्यात आलेल्या शासकीय शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंद
जिल्हास्तरीय  वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूचा विजय


मनमाड, 7 ऑक्टोबर (हिं.स.) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्यातर्फे राबविण्यात आलेल्या शासकीय शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी विजय संपादन केला. कनिष्ठ महाविद्यालयातील कु. आलेख पगारे ,६० कि. ग्रॅ. प्रथम, कु. तन्मय घुगे,७१ कि. ग्रॅ. द्वितीय, कु. साक्षी पवार ६३ कि. ग्रॅ. द्वितीय तर स्वामी सगळे ,जैद शेख यांनी सहभाग नोंदवला.

आलेख पगारे या खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत हिरे, संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ स्मिता हिरे, समन्वयक डॉ.अपूर्व हिरे, युवा नेते अद्वय हिरे, विश्वस्त संपदा हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. व्ही. पाटील, क्रीडा शिक्षक संदिप कोंडुरकर, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande