शेतकऱ्यांसाठी मदत पॅकेज : नमिता मुंदडांकडून सरकारचे आभार
बीड, 7 ऑक्टोबर (हिं.स.)।मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी भाजप महायुती सरकारने ३१,६२८ कोटी रुपयांचे मेगा पॅकेज जाहीर केले आहे. याबद्दल मुख्यमंत्री आणि सरकारचे केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी आभार व्यक्त केले आहेत
अ

खरडून गेलेल्या जमिनींसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ३.४७ लाख रुपये नुकसानभरपाई मिळेल, तर अत्यंत अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना थेट मदतीचा लाभ दिला जाईल. विहिरी गाळाने भरलेल्या शेतकऱ्यांना ३०,००० रुपये, दुधाळ जनावरांसाठी ३७,५०० रुपये मदत मिळणार आहे आणि “तीन जनावरांची अट” रद्द करण्यात आली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना १८,५०० रुपये, हंगामी बागायतदारांना २७,००० रुपये, बागायती शेतकऱ्यांना ३२,५०० रुपये प्रति हेक्टर मदत मिळणार आहे. विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना १७,००० रुपये प्रति हेक्टर मदत मिळेल. तसेच बियाणे व शेती पुनर्वसनासाठी १०,००० रुपये प्रति हेक्टर मदत आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानीसाठी १०,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या ऐतिहासिक निर्णयामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, भाजप महायुती सरकारच्या संवेदनशीलतेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा आशेचा किरण उजळला आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis

 rajesh pande