निर्यातक्षम फळपिकांसाठी हॉर्टीनेट प्रणालीद्वारे शेतनोंदणी करण्याचे आवाहन
सोलापूर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। युरोपियन युनियन व इतर देशांना फळपिकांची निर्यात सुनिश्चित करण्यासाठी अपेडाच्या हॉर्टीनेट प्रणालीद्वारे शेतनोंदणी प्रक्रिया राबविली जाते. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्यातून आजअखेर ४१ हजार ८४५ तर सोलापूर ज
निर्यातक्षम फळपिकांसाठी हॉर्टीनेट प्रणालीद्वारे शेतनोंदणी करण्याचे आवाहन


सोलापूर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। युरोपियन युनियन व इतर देशांना फळपिकांची निर्यात सुनिश्चित करण्यासाठी अपेडाच्या हॉर्टीनेट प्रणालीद्वारे शेतनोंदणी प्रक्रिया राबविली जाते. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्यातून आजअखेर ४१ हजार ८४५ तर सोलापूर जिल्ह्यातून २० हजार ८१ निर्यातक्षम फळबागांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व बागायतदारांनी चालू हंगामाकरिता हॉर्टीनेट प्रणालीद्वारे नोंदणी करण्यासाठी संबंधित कृषि सहाय्यक,कृषि पर्यवेक्षक,तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत नोंदणी पूर्ण करून निर्यातक्षम बागांची पात्रता सुनिश्चित करावी,असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande