जम्मू - काश्मीरमधील पूर - भूस्खलनग्रस्त शेतकऱ्यांसाठी पीएम-किसान योजनेचा २१ वा आगाऊ हप्ता जारी
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पूर आणि भूस्खलनग्रस्त शेतकऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान-किसान योजनेचा २१ वा हप्ता आगाऊ जारी केला आहे. सुमारे ८.५५ लाख शेतकऱ्यांच्या खा
Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan


नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पूर आणि भूस्खलनग्रस्त शेतकऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान-किसान योजनेचा २१ वा हप्ता आगाऊ जारी केला आहे. सुमारे ८.५५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे १७१ कोटी रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले, ज्यात ८५ हजाराहून अधिक महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. मंगळवारी कृषी भवनात झालेल्या समारंभात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, केंद्रीय कृषी सचिव डॉ. देवेश चतुर्वेदी आणि आयसीएआरचे महासंचालक डॉ. मांगीलाल जाट उपस्थित होते. जम्मू आणि काश्मीरचे कृषी मंत्री जावेद अहमद दार आणि इतर प्रादेशिक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील झाले होते. आजपर्यंत, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जम्मू आणि काश्मीरमधील शेतकऱ्यांना एकूण ४,०५२ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना शिवराज सिंह म्हणाले की, केंद्र सरकारकडून मिळालेल्या या रकमेतून पूर आणि इतर आपत्तींमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत मिळेल. त्यांनी सांगितले की,''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार बाधित शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे. सरकार त्यांना या संकटातून बाहेर पडण्यास मदत करेल''. सरकारने सुमारे ५,१०० घरांच्या पुनर्बांधणीसाठी ८५ कोटी रुपयांच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. शिवराज सिंह म्हणाले की, मनरेगा अंतर्गत १०० ऐवजी १५० दिवसांचे वेतन दिले जाईल. या आपत्तीच्या काळात इतर सर्व शक्य ती मदत केली जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande