लंडन , 7 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तान असा देश आहे, जो आपल्याच देशातील जनतेवर बॉम्ब फेकतात आणि नरसंहार करतात. तो केवळ जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी भारतावर खोटे नाटे आरोप करत असत,”असे विधान करत भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत पार्वथनेनी हरीश यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. ते मंगळवार, 7 ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत बोलत होते.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने कश्मिरी महिलांवर दशकानुदशके लैंगिक अत्याचार झाल्याचे आरोप भारतावर केले. त्याला उत्तर देताना राजदूत हरीश म्हणाले, “दुर्दैवाने दरवर्षी आम्हाला पाकिस्तानकडून आमच्या देशाविरोधात खोटे, दिशाभूल करणारे आरोप ऐकावे लागतात. विशेषतः जम्मू-कश्मीरबाबत, ज्यावर पाकिस्तान बेकायदेशीर ताबा करून आहे. महिलांचे हक्क, शांतता आणि सुरक्षा याबाबत आमचा विक्रम निर्विवाद आणि निष्कलंक आहे.”
पाकिस्तानचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “जो देश स्वतःच्या नागरिकांवर बॉम्बफेक करतो, पद्धतशीर नरसंहार करतो, त्याला फक्त अतिशयोक्ती करून आणि दिशाभूल करूनच जगाचे लक्ष विचलित करता येते.”
यावेळी राजदूत हरीश यांनी पाकिस्तानने 1971 मध्ये केलेल्या “ऑपरेशन सर्चलाइट” चा उल्लेख केला, आणि म्हटले की, “पाकिस्तान सरकारने तेव्हा स्वतःच्या लष्कराद्वारे 4 लाख महिला नागरिकांवर बलात्कार, हत्या आणि अत्याचार करणाऱ्या पद्धतशीर मोहिमेला मान्यता दिली होती.” ते पुढे म्हणाले, “जगाला पाकिस्तानच्या प्रचाराची खरी जाणीव आहे.”
मागील आठवड्यात जिनेव्हा येथे झालेल्या मानवाधिकार परिषदेच्या 60व्या सत्रात देखील भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.भारताच्या जिनेव्हामधील स्थायी मिशनचे काउंसिलर के. एस. मोहम्मद हुसैन यांनी म्हटले, “दुनियातील सर्वात वाईट मानवाधिकार नोंद असलेला देश जर इतरांना शिकवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याहून मोठे विडंबन असू शकत नाही.”
ते पुढे म्हणाले, “भारताविरोधातील खोट्या आरोपांसह या सन्माननीय मंचाचा वापर केवळ पाकिस्तानच्या दांभिकपणाचीच साक्ष देतो. निराधार प्रचार करण्याऐवजी, त्यांना त्यांच्या स्वतःच्या देशात होत असलेले राज्य-प्रायोजित अत्याचार आणि धार्मिक व जातीय अल्पसंख्यकांवरील पद्धतशीर भेदभाव याचा सामना करणे गरजेचे आहे.” भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, “जम्मू आणि कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode