नांदेडमध्ये ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आढावा बैठक संपन्न
नांदेड, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त येत्या नोव्हेंबर महिन्यात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, त्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी र
अ


नांदेड, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त येत्या नोव्हेंबर महिन्यात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, त्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे बैठक घेण्यात आली.

बैठकीत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी एकत्रित समन्वय ठेवून काम करावे, तसेच नेमून दिलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड शहरात सुमारे चार लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून, भाविकांच्या निवास, भोजन व पार्किंग व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुरज गुरव, तसेच माजी उपमहापौर सरजीतसिंग गिल, रणजितसिंग गिल, तेजसिंग राजेदसिंग बावरी आदी मान्यवर उपस्थित होते.या बैठकीत विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा घेण्यात आला असून, भाविकांना सर्व सुविधांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande