पुणे - जिल्हाधिका-यांच्या हस्ते ‘पर्पल फेस्ट गोवा एक्सपेडिशन’ मोहिमेचा शुभारंभ
पुणे, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। गोवा राज्य सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५’ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘पर्पल फेस्ट गोवा एक्सपेडिशन’च्या वाहनाला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हिरवी झेंडी दाखवून मोह
pune


पुणे, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। गोवा राज्य सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५’ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘पर्पल फेस्ट गोवा एक्सपेडिशन’च्या वाहनाला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हिरवी झेंडी दाखवून मोहिमेला शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी राधाकिसन देवढे आदी उपस्थित होते.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग आणि संयुक्त राष्ट्र संघ भारतातील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गोवा राज्य सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागातर्फे ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५’ सोहळ्याचे ९ ते १२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पणजी, गोवा येथे आयोजन करण्यात येणार आहे.

सोहळ्याला अधिक समावेशक स्वरूप देण्यासाठी कानपूर येथील सुनील मंगल यांच्या नेतृत्वाखाली ‘पर्पल फेस्ट गोवा एक्सपेडिशन’ या विशेष मोहिमेचे कानपूर येथून आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत ग्वाल्हेर आणि चंदीगड येथूनही दोन वाहने सहभागी झाली आहेत.

दिव्यांग व्यक्तीच्या क्षमतांचा सन्मान करण्यासाठी, तसेच त्यांच्या हक्कांचे समर्थन करण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांना एकत्र आणून या माहिमेला सर्व नागरिकांनी, संस्था, व्यावसायिक संस्था आणि सामाजिक संस्थांनी पाठिंबा देण्याकरिता ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५’ आयोजित केला जातो. यामध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande