हिंगोली, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)हिंगोली जिल्ह्याच्या अधिकार क्षेत्रातील हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ व वसमत या पाच पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अनुसूचित जाती-1, अनुसूचित जमाती (महिला)-1, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)-01, सर्वसाधारण प्रवर्ग-1 आणि सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) साठी निश्चित करुन देण्यात आलेले आहे.
वर उल्लेख केल्याप्रमाणे दि. 9 सप्टेंबर, 2025 च्या शासन अधिसूचनेप्रमाणे पाचही पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी शुक्रवार, दि. 10 ऑक्टोबर, 2025 रोजी नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे विशेष सभा आयोजित केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील नागरिक, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, वृत्तपत्रांचे पत्रकार यांनी आरक्षण सोडत सभेस उपस्थित राहावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis